आज, ह्या संकेतस्थळाचा पुनर्जन्म झाल्यावर ह्याच ओळी आठवल्या!

एकाच या
जन्मी जणु ,
फिरुनि नवे
जन्मेन मी

नमस्कार अमृते, 🙏
२०१९ च्या अखेरीस माझा Godaddy (domain registrar for amrute.me) खात्यावरील ताबा गेला व माझ्या डोळ्या देखत amrute.me website निसटली ! 😒 Registration expiry निघून गेली, grace period चा काळ लोटला, व amrute.me domain name, marketplace बाजारात खुले झाले. क्षणार्धातच कोणीतरी ते आपोवाप विकत घेतले. Programmatic bots हे माणसांपेक्षा जलद असतात वेगळे सांगायला नको. मी रेस हरलो.

नाव गेले परत हवे असल्यास $6000 dollars ला विकत घ्या .

Scavengers of domain buyback industry.

“काय, ४-५ लाख रुपये? नको, No thanks!”

March 2020 -2023 तीन वर्षे त्यांनी हे नाव $६००० डॉलर्स ला विकायचा प्रयत्न केला. शेवटी मला ते परत ताब्यात मिळाले. आपली हरवलेली मौल्यवान वस्तू परत मिळाल्यावर जसा आनंद होतो तसे आहे हे. 😎
तर अशा ह्या नवसाच्या दिव्याला परत गमवायचे नाही व हा ब्रँड खरंच $६००० चा बनवायचा हेच धेय्य घेऊन पुनःच् हरिओम !