आज, ह्या संकेतस्थळाचा पुनर्जन्म झाल्यावर ह्याच ओळी आठवल्या!
एकाच या
जन्मी जणु ,
फिरुनि नवे
जन्मेन मी
नमस्कार अमृते, 🙏
१० हून अधिक वर्षे जपलेली साइट, अखेरीस २०२० मध्ये गेली. lockdown च्या काही महीने आधी माझा Godaddy (domain registrar for amrute.me) खात्यावरील ताबा गेला व माझ्या डोळ्या देखत amrute.me website निसटली ! 😒 Registration expiry निघून गेली, grace period चा काळ लोटला, व amrute.me domain name, marketplace बाजारात खुले झाले. आता ते कुणीही विकत घेऊ शकते, मी तयारच होतो backorder घेऊन. पण क्षणार्धातच कोणीतरी ते आपोवाप विकत घेतले. Programmatic bots हे माणसांपेक्षा जलद असतात वेगळे सांगायला नको. माझा काय निभाव लागणार, मी रेस हरलो.
नाव गेले परत हवे असल्यास $6000 dollars ला विकत घ्या .Scavengers of domain buyback industry.
“काय, ४-५ लाख रुपये? नको, No thanks!”
March 2020 -2023 तीन वर्षे त्यांनी हे नाव $६००० डॉलर्स ला विकायचा प्रयत्न केला. त्यांनी केलेली गुंतवणूक संपली पण माझा सैय्यम पुरून उरला! शेवटी मला हे नाव परत ताब्यात मिळाले. आपली हरवलेली मौल्यवान वस्तू परत मिळाल्यावर जसा आनंद होतो तसे आहे हे. 😎
तर अशा ह्या नवसाच्या दिव्याला परत गमवायचे नाही व हा ब्रँड खरंच $६००० चा बनवायचा हेच धेय्य घेऊन पुनःच् हरिओम !